भूमिकापालन
स्वताला आणि इतरांना चांगल्या रीतीने समजावून घेण्यासाठी या भूमिकांचे, त्यामागील कारणांचे आकलन व्हायला हवे. त्यासाठी इतरांच्या भूमिकेत शिरता यायला हवे. या प्रकारे सहनुभूवामुळेच विविध आंतर्क्रिया, सामाजिक घटना याचा अर्थ लावती येणे शक्य होते भूमिकापालन हे यासाठी उपयुक्त माध्यम ठरते
व्याक्ख्या- हा अभिरुपतेचा प्रकार आहे. येथे भूमिका सादर करणाऱ्या व्यक्तीमधील आंतरक्रिया महत्वाच्या असतात. भूमिकापालानासाठी कोणत्याही प्रकारचे नियम अथवा कोणत्याही प्रकारची स्पर्धा अपेक्षित नसते.
वैशिष्ट्ये
भूमिकापालन हा अभिरुपतेचा एक प्रकार
जीवनाशी निगडीत अशी एक समस्या घेऊन तिच्यावर आधारित प्रसंग
भिमिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील आंतरक्रियेला महत्व
भिमिका पालन सादर करण्याचे कोणतेही नियम नसतात
विशिष्ट भूमिकांमध्ये शिरून त्या भूमिकांची मनस्थिती विद्यार्थ्यांनी जाणणे.
हेतू
विद्यार्थ्यांच्या भावना, दृष्टीकोन यांना योग्य दिशा देणे
विद्यार्थ्यांमध्ये विविध सामाजिक कौशल्यांचा विकास करणे
विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडविण्याच्या कौशल्यांचा विकास करणे
विद्यार्थ्यांमध्ये अभिकृती, मुल्ये आणि अवबोध यामध्ये वाढ करणे
उद्देशबिंदू सहाय्यभूत प्रणाली संरचना सामाजिक प्रणाली प्रतिक्रियेची तत्वे भिमिकापालन प्रतिमांचे घटक
उद्देशबिंदू
विद्यार्थ्यांना जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विविध भिमिकांचा परिचय करून देणे
विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडवण्यास तयार करणे
विद्यार्थ्यांना सामाजिक आंतरक्रियेसाठी सक्षम बनविणे
विद्यार्थ्यांना वास्तव जीवनातील समस्यांची जाणीव निर्माण करणे
विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भिमिका वठवून इतरांचा विचार करावयास सक्षम करणे
संरचना
या प्रतीमानामध्ये ९ पायर्यांचा समावेश होतो
९ तत्वाशोधन
८ पूर्णचर्चा, पुनमुल्यांकन
७ पुनअभिनय
६ चर्चा व मूल्यमापन
५ अभिनय दाखविणे
४ निरीक्षकाची निवड करणे
३ रंगमंच व्यवस्था करणे
२ पात्रांची निवड करणे
१ मनोभूमिका तयार करणे
सामाजिक प्रणाली
शिक्षकाने प्रसंग सादर करणे
समस्या उपस्थित करणे
विद्यार्थ्याच्या सहभागाचे चर्चा, अभिनय करणे
शिक्षकाचे नियंत्रक म्हणून कार्य राहील परंतु विद्यार्थ्यांवर दबाव न येत त्याचे वर्तन मोकळेपणाने होईल याची दक्षता घ्यावी
प्रतिक्रियेची तत्वे
विद्यार्थांच्या सूचना व प्रतिक्रियांचा शिक्षकांनी स्वीकार करणे
निरीक्षकांनी केलेल्या सूचनांचा स्वीकार करणे
भूमिकाकर्त्यांच्या भावनांचा स्वीकार करणे
विद्यार्थी प्रतिक्रियांचा प्रतिसाद देऊन अर्थ लावणे
साहाय्यभूत प्रणाली
या प्रतीमानासाठी लागणारे साहित्य
समस्या तयार होणारे प्रसंग
व्यक्तीवैशिष्ट्यानुसार विद्यार्थी निवडणे
निरीक्षण सूची
भूमिकापालन प्रतीमानाचे फायदे सामाजिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तणाला दिशा देण्यास मदत करते
विद्यार्थ्याला आपल्या भावना संबंधित भूमिकेवर प्रक्षेपित करता येतात
मानवी संबंधबाबतचा कौशल्यांचा सराव करण्याची संधी मिळते
इतरांच्या मतांचा आदर करणे वा ती मान्या करणे ही प्रवृत्ती जोपासण्यास उपयोग होतो
विविध संकल्पांना, अमूरता कल्पना यांना मुर्त स्वरुप देता येते वा त्यामुळे आकलन होऊन दृष्तीकरण होते
सामाजिक समस्या भावानेशी संबंधित समस्या स्थितीचे स्त्रोत लैंगिक समस्या नैतिक मूल्यांशी संबंधित आर्थिक समस्या
प्रतिमनाचे परिणाम / उद्दिष्टे
अध्यापनीय परिणाम
वैयक्तिक मुळ्ये आणि वर्तनाचे विश्लेषण होते
आंतर वैयक्तिक
समस्या सोडविण्याचे मार्ग प्राप्त होतात
सहानुभव वाढतो भूमिकापालन प्रतिमान
पोषीत परिणाम
सामाजिक समस्या आणि मुये याबाबत काही तथ्ये माहीत होतात
मते व्यक्त करणे जमू लागले
शैक्षणिक व पोषक फायदे
मत व्यक्त करून समाधान मिळवणे
भूमिकापालन प्रतिमान
व्यक्तिगत मूल्ये आणि वर्तन यांचे विश्लेषण
व्यक्ती-व्यक्तीमधील समस्या सोडविण्यासाठी कार्यनितिच
विकास
दुसर्याण्चे अनुभव दाखविणे
सामाजिक समस्या आणि मूल्यांचा विषयी वस्तुस्थितीची माहिती
प्रतिमनाचे वर्गाध्यपनत उपयोजन
विविध वैयक्तिक तसेच सामाजिक समास्यसंदर्भात भूमिकापालाणाला संधी देता येईल . जात पात पाळणे, अंधश्रद्धा भावनांची अयोग्य प्रकारे होणारी अभिव्यक्ती यावर भूमिकापालन करता येईल, तसेच ऐतिहासिक प्रसंग
ब्रिटीश काळात अन्न धाण्या ऐवजी व्यापारी पिकांच्या मागे गेलेले शेतकरी , अदानीपणामुळे येणारा कर्जा बाजारीपणा, स्त्रियांचे प्रश्न यावर भूमिकापालन वा चर्चा घेता येते.
Very deep n easy language to understand the concept..thanku sir
ReplyDeleteNice
ReplyDelete