About Me

My photo
H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.

Tuesday, 26 April 2011

जब कभी गम सताए
कोही बात दिलको भाये
आंखोसे आसू छलक आये
याद् करके देखना हमें
शायद एक आंसू कम हो जाये
आपने हमें गम दिलाया
कोई बात नहीं दिलको जलाया
आंखोमे आंसू होतो आये
आप याद करके देखना हमें
कभी आपका जी घबराये

Monday, 25 April 2011

कविता _तू आणि मी हे नात किती छान आहे

तू आणि मी हे नात किती छान आहे .
दोघांच्याही मनात दडलेलं प्रीतीचे पान आहे .
नाते तुझे नि माझे कवच कुंडलाचे दान आहे कि ,
हृदयाच्या कोपऱ्यात अंकुरलेले ते
वाढलेले प्रीतीचे रान आहे .
तू नसतेस माझ्या जवळ याचे मला भान आहे .
 प्रेमात नको फुलायला, सोबत नसण्याची जान आहे .
 कधी अंकुरेल प्रीती तुझी mazi ?
.कि अंधारातील सुटलेला बाण  आहे.
पण ,अचूक भेदला तर माझ्या प्रीतीचा खरा मान आहे . 

Saturday, 23 April 2011

corruption

उठल्या उठल्या भ्रष्टाचाराची बातमी दिसते खरी
आपण असलो स्वतंत्र भारताचे नागरिक जरी

सर्वच भ्रष्टाचाराच्या मागे फिरताना दिसतात
बाळगतात भारताचा विकास मात्र उरी !

तू तुझा विकास साधण्याचा फक्त विचार करतो
सेजाऱ्या पाजारयावर मात्र जळतो
स्वताच विचार दुसऱ्यांच्या उतरवतो गळी !

आपण असलो स्वतंत्र भारताचे नागरिक जरी !

Wednesday, 20 April 2011

मी समाजाचा भाग आहे_चारोळी

आपण समाजात राहातो काय ?  मग समाजाला काही देणे लागतो ?  असे असेल तर वीचार  करायला नको ?
मी समाजाचा भाग आहे
वीच्याराची आग आहे .
कोंबून कीती ठेवाल आम्हाला
ही तर आलेली जाग आहे .

Monday, 18 April 2011

समाजात काय चालले ?

सर्व आपला ,आपल्या घराचाविचार करताना दिसतात .समाजाचं संपूर्ण विचार करु नका पण आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांचा तर विचार करा .एवढ केलतरी खारीचा वाट उचलल्या सारखे होईल व समाजाचे काहीतरी ऋण फेडल्या गत होईल .जरा विचार् करा आणि आपला पुढील प्रवास चालुलागा .

Friday, 15 April 2011

समाज कार्याची सुरुवात कुठून करायची_कल्याण येथील एक क्षण

 समाज कार्याची सुरुवात कुठून करायची हा प्रश्न नाही ती करण्याची गरज आहे .आपण उगाच समाजसेवा करण्याच्या गप्पा मारतो, करतो कधी ? दुसऱ्या कडून अपेक्षाही करतो पण माझ्याकडून समाजाची अपेक्षा काय आहे याचा विसर मला पडला आहे .आताच कार्याची सुरवात करा ..............................!

बाबासाहेबांचा विचार_चारोळी

बाबासाहेबांचा विचार देशाला दिशा देणारा आहे ,
मग तू त्या दिशेने का जात नाही ?
उगाच दिशा दर्शक होण्याचा प्रयत्न करतो .
समाज सेवेपासून स्वर्थापाई पळतो .
आता तरी काहि धडा घे ,
थोडा कार्याचा विडा घे .

तुझा हात सोडताना कंपने अनेक आले_चारोळी



तुझा हात सोडताना कंपने अनेक आले ,
मनातही माझ्या विचार राहून गेले .
जाण्याचा मोह तुला आवरता आला नाही,
क्षणाचा विचारही तु केला नाही ,
मग कशाला वळून बघते माझ्या कडे
तुला तर आहे सारे रान मोकळे .

My son siddhesh...........!


हा माझा मुलगा सिद्धेश , दिसतो मोठा गोड ! पण आहे मात्र फार खोडकर.हा आईचा लाडका आहे , पण कामासाठी ताई म्हणतो .बाबाना फक्त खाऊसाठी विचारतो .खोड्या करणे त्याचा हातखंड .कधीकधी स्वताला वाईट सुद्धा म्हणाला मागेपुढे बघत नाही,तेव्हा मात्र खरोखरच शहाणा वाटतो .झोपी गेल्या नंतरच त्याचा फार लाड करावेसे वाटते .असा हा माझा मुलगा सिद्धेश !हि आहे सिद्देश्ची आई आणि ताई ,मुलासोबतच उन्नतीला जपणारी आई .उन्नती आता हुशार झाली स्वताच आपली कामे करून शाळेत जाते.आईला कुठलाच त्रास न देता .अशी आई ,ताई . .

आपण द्वेष कुणाचा करू नये_चारोळी


आपण द्वेष कुणाचा करू नये
गृहीत कुणाला धरु नये
सगळेच चांगले असतात
विचारांनी  उगाच सरू नये !
कुणीही अत्याचार करत असतील
म्हणून का आपण करावे 
उगाच का त्यांना जाळावे 
याचाही आपण विचार करावे का ?
विचारांशी उगाच पाळावे का? 
आपण जर एखद्या जबाबदार संस्थेचे अधिकारी असाल तर तुम्ही वैक्तिक आपले संबंध कसे आहे याचा विचार करू नका .तुम्ही आपल्या संस्थेचा विचार करा .वैक्तिक समंधाला विसरून आपल्या संस्थेला काय फायदा होतो ते बघा .असे करत असाल तर तुम्ही समाजाचा फायदा करता जर असे करत नसाल तर तुम्ही आपला फायदा बघता आहात, समाजाचा नाहीं हे लक्षात घ्या .ज्यांचा आपण विचार करत आहात त्यांच्या कडे वस्तुनिष्ठा प्रमाणे बघा .

Thursday, 14 April 2011

आपण विच्यार करतो काय ?

बाबासाहेबा सोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र रात्रीच्या मुकामाला  होते त्यातील  एकाने बाबासाहेबांना प्रश्न केला की,आपण अजून झोपला नाहीत इतर सर्व झोपी गेलेत. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितले, जे गाढ झोपले आहेत त्यांचा समाज जागृत आहे पण माझा समाज अजूनही झोपला आहे त्यामुळे मी त्यांना जागृत करण्यास झोपलो नाही .

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे

आपण माझ्यासोबत आहात असे गृहीत धरून मी आपणाशी हितगुज करणार आहे.