About Me

My photo
H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.

Thursday, 23 March 2017

महिला साक्षीमीकरणासाठी विविध योजना

राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेस प्रारंभ
जन्माला येणार्‍या मुलांमध्ये मुलीचे घटते प्रमाण शासनाने गांभीर्याने घेवून संपूर्ण राज्यात मुलीच्या जन्मासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शुक्रवार 1 एप्रिल 2016 पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही अभिनव योजना कार्यान्वित केली आहे.यापूर्वी शासनाने संपूर्ण राज्यात  ‘सुकन्या’ योजना 1 जानेवारी 2014 रोजी सुरू केली, तर केंद्र शासनाने  ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही योजना फेब्रुवारी 2014 ला सुरू केली. सन 2011 च्या जनगणनेनुसार देशातील 100 जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात कमालीची घसरन झालेली आढळून आली. यावर उपाय म्हणून केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून मुलीव मुलगा यांचे प्रमाण सम पातळीवर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. या  केंद्र पुरस्कार योजनेत महाराष्ट्र राज्यातील मुलींचा जन्मदर घसरलेल्या 10 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. यात बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, उस्मानाबाद, सांगली, जालना आणि कोल्हापूर  जिल्ह्याचा समावेश आहे. 
महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर 1000 मुलांच्या मागे 894 एवढा आहे. त्यामुळे मुलींच्या जन्माबाबत समाजात सकारात्मकता आणण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘सुकन्या योजना’ सुरू करण्यात आली. या योजनेत दारिद्य्ररेषेखालील कुटूंबात जन्मलेल्या मुलींच्या नावावर एका वर्षाच्या आत 21 हजार 200 रुपयाचा भरणा शासनाकडून आर्युविमा महामंडळाच्या गुंतवणुकीच्या स्वरूपात केला जाणार आहे. ती रक्कम मुलगी 18 वषार्ंची झाल्यानंतर 1 लाख देण्याची तरतुद आहे. ‘सुकन्या’ योजनेचे 26 फेब्रुवारी 2016 रोजी  ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय  घेवून सुकन्या योजनेचे लाभ या योजनेत कायम ठेवले आहेत. नव्याने सुरू करण्यात येणार्‍या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा दारिद्य्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील कुटूंबात जन्माला येणार्‍या मुलींना देण्यात येणार आहे. एकूलती एक मुलगीच्या मातेने कुटुंब नियोजन असणे. एक मुलगी व दुसर्‍या मुलीनंतर कुटूंब नियोजन केले तरच या योजनेस लाभार्थी पात्र ठरणार आहे. मात्र, एक मुलगा व एक मुलगी असणार्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्वरूप योजनेत निश्‍चित  करण्यात आले आहे. मुलगी जन्माला आल्यावर जन्मदिन साजरा करण्यासाठी 5 हजार व दुसरी मुलगी जन्माला आल्यावर 2 हजार  500 रुपये देण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मुलगी व आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते बँकेत उघडण्यात येणार आहे. त्यामुळे 1 लाख अपघात विमा व 5 हजार रूपये ओव्हड्राफ्टचा लाभ मिळणार आहे. मुलीच्या नावावर शासनामार्फत 21 हजार 200 रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 1 लाखांची विम्याची रक्कम देण्यात येणार आहे. आम आदमी योजनेअंतर्गत मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून नाममात्र 100 रुपये प्रतिवर्षी इतक हप्ता जमा करून मुलीच्या  वडिलांचा विमा उतरविण्यात येणार आहे. मुलीच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाल्यास 75 हजार रूपये, नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार रुपये, दोन डोळे अथवा दोन अवयव  निकामी झाल्यास 75 हजार रूपये , एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास 37 हजार 500 रूपये देण्यात येणार आहे. 
आम आदमी योजने अंतर्गत शिक्षा सहयोग योजनेतून इयत्ता 8वी, 10 वी, 12 वी मध्ये शिकणार्‍या मुलीला शिष्यवृत्ती, प्रति 6 महिने 600रूपये देण्यात येणार आहे. तसेच जन्माला येणारी मुुलगी 5 वर्षांची होईपर्यंत प्रतिवर्षी 200 रु. प्रमाणे 5 वर्षांसाठी 10 हजार रुपये व दोन मुलींसाठी प्रत्येकी 1000 या प्रमाणे 10 हजार रुपये दर्जेदार पोषण आहारासाठी देण्यात येणार आहे. प्राथमिक शाळेत 1 ली ते 5 वीतील मुलींना प्रतिवर्षी 2 हजार 500 रुपये याप्रमाणे 12 हजार 500 रूपये व दोन्ही मुलींना प्रत्येकी 1 हजार 500 रुपये प्रमाणे 15 हजार 5 वर्षापर्यंत  गुणवत्तापूर्वक पोषण आहारासाठी देण्यात येणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक मध्ये 6 वी ते 12 वी मध्ये शिकणार्‍या मुलींना प्रतिवर्षी 3 हजार रूपये या प्रमाणे 21 हजार रूपये , दोन मुलींना प्रत्येकी 2 हजार रूपये याप्रमाणे 25 हजार रुपये, 7 वर्षापर्यंत देण्यात येणार आहे. तर वयाच्या 18 व्या वर्षी मुलगी अविवाहीत असल्याचे वडीलांना प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे आहे. विम्याच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1 लाख पैकी 10 हजार मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे अनिवार्य असणार आहे. मुलीचा जन्म झाल्यावर आजी-आजोबाना प्रोत्साहन भेट म्हणून पहिल्या मुलीनंतर मातेने कुटूंब नियोजन केल्यावर सोन्याचे नाणे 5 हजार रुपये किंमतीचे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या लिंग गुणोत्तर प्रमाणपत्रावर त्या-त्या गावाचा गौरव करताना ग्रामपंचायतींना 5 लाखाचे बक्षीस महिला व बालकल्याण मंत्र्याच्या हाते देण्यात येणार आहे. ही योजना यशस्वीरित्या  राबविण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या 7 सदस्यीय समितीचे अध्यक्ष महिला व बालविकास विभागाने प्रधान सचिव असणार आहे. या समितीच्या बैठका दोन-चार महिन्यानंतर होणार आहेत. तर अंमलबजावणीसाठी  एक कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त असणार आहे. या समितीत प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही असणार आहेत. या समिती मार्फत दरवर्षी योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी दर तीन महिन्यातून एकदा बैठक होणार आहे.
या योजनेसाठी सर्व बी.पी.एल. व ए.पी.एल. कुटूंबात जन्मलेल्या दोन मुलीचे जन्म प्रमाणपत्र, विमा क ामासाठी 18 वर्षे पूर्ण, मुलगी 10 वीपर्यंत उत्तीर्ण  होणे अनिवार्य, दुसर्‍या प्रसुतीत जुळया दोन्ही मुलींना योजनेच्या लाभासाठी पात्र, दत्तक मुली 0 ते 6 वयोगटातील लाभार्थी असणार आहेत. तसेच ही योजना आधार सोबत जोडली जाणार आहे. त्याचप्रमाणे विहीत मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास अथवा मृत्यू झाल्यास त्याचा फायदा वडीलांना मिळणार नाही. शासनाने तिच्या नावावर जमा केलेली रक्कम शासनाकडेच वर्ग केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment