सज्जता प्रवर्तन
पाठाचा उद्धेश व विद्यार्थांचे विविध अनुभव यांची सांगळ घालण्याच्या हेतूने शिक्षकाने केलेली वर्गातील कृती आणि विधाने म्हणजे सज्जता प्रवर्तन होय .
कौशल्याचे उद्देश व हेतू
१ विध्यार्थ्याचे अवधान वेधून घेणे
जाणीव क्षेत्रातील विशिष्ठ वस्तू जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय .
उद्दिपकाची नाविन्नता ,तीव्रता ,आकार ,हालचाली ,विरोध ,पुनरावृत्ती ,इ समावेश होतो .
२ अध्ययनासाठी प्रेरणा देणे
प्रेरणा म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचा प्रारंभ,सातत्य आणि दिशा ठरविण्यास कारणीभूत होणार्या मानसिक प्रक्रियाचा संच होय
आकांशाची पातळी,सिद्धि प्रेरणा -आपल्या वर्तनात सतत सुधारणा करून अधिकाधिक साध्य करण्याच्या गरजेला ,सिद्धि प्रेरणा असे म्हणतात जिज्ञासा किव्हा कुतूहल ,सौम्य चिंता .
प्रेरनादाई कृती कोणत्या. ?
मुक्त प्रश्न दृक्श्राव्य साधनाचा वापर ,,तुलना करणे.भूमिकापालन ,अभिरुपता कथाकथन ,उदाहरणे देणे(-उष्णतेचे प्रसारण ,गुरुत्वाकर्षण ),धककादायक कृती (मागास्वर्गीयानी बाहेर जावे )दिग्दर्शन पद्धतीव प्रयोग .
३ विद्यार्थांची शारीरिक ,बौद्धिक व भावनिक तयारी करून देणे .
४ अध्यायनाच्या दृष्टीने पुर्वज्ञानाची तयारी करणे .
५ प्रावीण्याची जाणीव करून देणे .
६ विषय ची सौम्य चिंता निर्माण करून अध्ययनास चालना देणे .
७ अभिरुची ,उत्सुकता निर्माण करून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे .
८ अध्ययन कार्याची मर्यादा स्पष्ट करणे .
९ पुर्वाज्ञाची अपरिचित घटकाशी सांगड घालणे .