About Me

My photo
H 22 Indraprasth chs near pratiksha nagar bus depot sion, Maharashtra, India
अन्यायाची चीड यावी असा माझा स्वभाव आहे .मित्र करण्यापेक्षा टिकविणे अधिक आवडते.मी सध्या sndt university,pvdt college of education mumbai येथे प्राध्यापक म्हणून कार्य करतो.

Tuesday, 15 January 2019

विवेकानंद जयंतीनिमित्त

विवेकानंद यांच्या जयंती निमित्य दिलेले अध्यक्षीय पी व्ही डी टी कॉलेज येथील संक्षिप्त भाषण
##स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन करतो मंचावर उपस्थित माझे मित्र डॉ महेश कोलतमे सर,उपस्थित माझे सहकारी वर्ग व माझ्या विद्यार्थिनी आज विवेकानंद जयंती निमित्त मला बोलण्याची संधी मिळाली मी आयोजकांचा आभारी आहे.
खर म्हणजे विवेकानंद यांनाच भेटलेल्या व्यक्तीच महान होत्या त्याचे गुरू रामकृष्ण परमहंस हे त्यातील एक होय परंतु जेव्हा स्वामींना शिकागोला जायचे होते त्याआधी गुरू कालवंश झाले होते तेव्हा ते पोरके झाले ,कोणतेही कार्य करतांना स्वामी गुरूचा आशीर्वाद घेत असत परंतु गुरू नसल्याने त्यांनी गुरुमा शारदा यांचे आशीर्वाद घेण्याचे ठरविले व त्यांनी इच्छा दर्शवली जेव्हा भेटले तेव्हा गुरुमाने  सांगितले की आपण आशीर्वाद घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी यावे .गुरुमाना सुद्धा विवेकानंद यांना परखाचे होते कारण ते परदेशात हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करणार  होते ,विवेकानंद गुरुमा ला भेटण्यास त्यांच्या घरी गेले तेव्हा त्या स्वयंपाक घरात काम करीत होत्या तेव्हा आपण आशीर्वाद घेण्यास आलो हे स्वामींनी सांगितले त्यावेळी गुरुमाने त्यांना सांगितले की समोर पडलेला चाकू भाजी कापण्यास द्या तेव्हा विवेकानंद यांनी तो चाकू जिकडे मूठ होते ती बाजू गुरुमा कडे करून सुपूर्द केला कारण काय तर त्यांना इजा होऊ नये हाच विचार होता.त्यांना जे  परखायचे होते ते साध्य झाले होते,सामान्य माणसाने नेमके विवेकानंद यांच्या विरुद्ध कृती केली असती परंतु विवेकानंद यांनी विचारांची प्रगल्भता व्यक्त केले.जो माणूस इतका विचार करू शकतो तोच खऱ्या अर्थाने भारताचे  प्रतिनिधित्व करू शकतो त्यामुळे गुरुमाने त्यांना आशीर्वाद दिला.आपण केवळ आपलाच विचार करतो दुसऱ्याचा विचार करीत नाही आपण दुसऱ्यांचा विचार करायला शिकलं पाहिजे व असे विचार प्रगल्भ व्हायला पाहिजे .  आज समाजा मध्ये आदरभाव समाप्त झाल्याचे दिसून येते  कुणीही कुणाचा आदर करीत नाही परंतु सर्वांनी माझा आदर केला पाहिजे अशी भावना असते .आपण आपला ,आपल्या संस्कृतीचा आदर करतो काय?आपल्या भाषेचा तरी आदर करतो काय?मग दुसऱ्याच्या भाषेचा आदर दुरास्तवच. स्वामीं एकदा विदेशात गेले तेव्हा तेथील काही व्यक्तींनी त्यांना अभिवादना साठी' hello'असे संबोधले तेव्हा त्यांनी नमस्ते असे म्हटले यावर इतरांना वाटले की स्वामींना इंग्रजी येत नाही आणि म्हणून त्यातील एकाने 'आप कैसे हो' असे विचारले तेव्हा स्वामी उत्तरले' Iam fine Thank you' त्यात सर्वांना आश्चर्य वाटले की त्यांना इंग्रजी पण येते.जेव्हा या बाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही तुमच्या आईचा  आदर केला तेव्हा मी माझ्या मातेचा  आदर दर्शविला व जेव्हा तुम्ही माझ्या मातेचा आदर केला मी सुद्धा तुमच्या मातेचा आदर केला यातून आम्हाला ही शिकवण मिळते की आपण प्रथम आपल्या भाषेचा,संस्कृतीचा आदर केला पाहिजे व सोबतच इतरांच्या भाषेचा व संस्कृतीचा सम्मान केला पाहिजे.आज स्त्री कडे बघण्याचा समाजाचा व लोकांचा दृष्टिकोन भोग  वस्तू म्हणून आहे पण स्त्री ही भोग वस्तू नसून तिचा सम्मान झाला पाहिजे व त्यासाठी विचार प्रगल्भ झाला पाहिजे पुरुषांची विचारक्षमता स्वामी सारखी झाली पाहिजे आणि हे स्वामींचे विचार आत्मसात करून होऊ  शकते.एकदा एका विदेशी  स्त्रींने विवेकानंद यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला या विचारा मागे  तिचा असा दृष्टिकोन होता की स्वामी विवेकानंद सारखा उत्तुंग  विचारांचा पुत्र प्राप्त होईल व संस्कृत  समाज निर्मानासाठी विचारवंत मिळेल तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी त्यांना शांतपणे सांगितलेला विचार महत्वाचा आहे त्यांनी त्या स्त्रीचा अपमान नकरता सांगितले की मी एक संन्यासी आहे व मी विवाह करू शकत नाही परंतु तुमची इच्छा पूर्ण करू शकतो तुम्हाला माझ्या सारख्या पुत्र पाहिजे ना मग मीच आपला पुत्र आज पासून होतो .असा विचार करणारे फक्त नी फक्त विवेकानंदच होऊ शकतात स्त्रियांचा आदर करणे त्यांच्या कडून शिकले पाहिजे.भारताची संस्कृती सर्व इतर देशांच्या संस्कृती पेक्षा श्रेष्ठ आहे समावेशक आहे थोरांचा आदर करणे,महिलांचा सम्मान करणे,भाईचारा, समानता,बंधुता आदर ही सामाजिक वैशिष्ट्य आमची आहे कारण आमची संस्कृती विचाराच्या भक्कम पायावर उभी आहे म्हणूनच आम्हाला आमच्या संस्कृती बद्दल अभिमान आहे.दुर्दैवाने आम्ही पेहरावा वरून लोकांची संस्कृती ठरवितो, अशीच एक घटना आपणास विवेकानंद विषय सांगू इच्छितो जेव्हा कार्यक्रमासाठी विवेकानंद विदेशात गेले तेव्हा एक विदेशी व्यक्तीने विचारले की आपले सामान कुठे आहे ?कारण स्वामी फक्त अंगावर धारण केलेल्या पेहराव शिवाय त्यांचे कडे काही नव्हते त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे दुसरे कोणतेही समान नाही तेव्हा ती व्यक्ती आश्चर्य व्यक्त करू लागली त्यांना स्वामीजी सुटाबुटात अपेक्षित होती त्या बाबत विचारना केली असता विवेकानंद यांनी त्यांना मार्मिक उत्तर दिले की तुमची संस्कृती तुमचा शिंपी ठरवितो त्यामुळे आपण कपड्यांवर लक्ष देता आमची संस्कृती ही कपड्यावर नसून विचारावर आहे .म्हणून माणसांचे विचार उच्चकोटीचे असावे साधपोशाख जरी असला तरी विचारला योग्य धार असावी हेच यातून व्यक्त होते.आपल्या जीवनात बरेचदा संकटे येतात तेव्हा आपण संकटांना तोंड न देता त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो व अपयशी होऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो.जी लोक मोठी झाली ती खरे तर संकटांना समोरेजाऊन उदाहरण सांगावयाचे झाल्यास फुले दाम्पत्य,आंबेडकर यांना संकटांना सामोरे जावे लागले संघर्ष करावा लागला.स्वामी विवेकानंद सुद्धा घाबरायचे ते एकदा एका मंदिरात गेले असता त्यांना माकडांनी घेरले व त्याच्यावर चालून गेले त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला ही सगळी घटना एक संन्याशी बघत होता त्यांनी विवेकानंदाना थांबवले व सांगितले की तुम्ही पळून जाऊ नका तर त्याचा सामना करा स्वामींनी त्यांचे ऐकून  माकडा कडे आगेकूच केली तेव्हा सर्व माकडे तेथून पसळून गेली .स्वामीजी ही घटना आपल्या भाषणात सांगतात ही एक प्रेरणादायी प्रसंग ते मानतात जीवनात अशी संकटे येतात पण आपण संघर्ष केला पाहिजी.आपण सर्व विद्यार्थिनी युवती आहात आज आपण विवेकानंद जयंती युवकदिन म्हणून साजरा करतो वयाने युवक ठरत नाही तर विचाराने युवक ठरतो हे प्रमुख वक्त्याने आपणास सांगितले आहे त्यामुळे आपण विचार भक्कम केले पाहिजे व विवेकानंद यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे व त्यावर अमल केला पाहिजे .संयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद!